Uncategorized

शाळकरी मुलीचा पाठलाग व छेडछाड प्रकरणी आरोपी अटक, ‘पोक्सो’ दाखल!

महासूत्र न्यूज

उमरखेड :  एका १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा, गेल्या एक महिन्यापासून सतत पाठलाग सुरू होता. दरम्यान २२ ऑगस्टला अश्लील शेरेबाजी करत छेडछाड केल्याची गंभीर घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी, २० वर्षीय आरोपीविरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये, पोक्सो गुन्हा दाखल करून, आरोपीला त्याच रात्री अटक केली आहे.

 

  संदेश संतोष राठोड (वय २०) असे अटकेत असलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी उमरखेड येथील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. आपल्या आजीच्या घरून ती, दररोज बसने शाळेत जात असते. अश्यातच आरोपी संदेश हा मोटरसायकलने तिचा सतत पाठलाग करायचा. काही दिवसांपूर्वी आरोपीने बसस्थानकाजवळ पीडितेजवळ येत अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केले. मुलीने त्याला धैर्याने खडसावले असता, नराधमाने तिच्याभोवती दुचाकीचे फेरे मारून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या आजी आजोबांना सांगितला.

दरम्यान, पुन्हा २२ ऑगस्ट रोजी आरोपी युवक, मुलगी राहत असलेल्या शेताजवळील एका ठिकाणी बसलेला दिसल्याने, मुलीने याबाबत आपल्या आजीला माहिती दिली. आजीने ही बाब मुलीच्या वडिलांना सांगितली. तेव्हा लागलीच तिथे पोहचून, वडिलांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी त्याला हटकले व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुधारण्याऐवजी आरोपीने उलट पीडितेच्या वडिलांनाच अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. शिवाय अरेरावी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला आणि गुंडगिरीला कंटाळून अखेर पीडितेच्या कुटुंबाने उमरखेड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी संदेश विरुद्ध ‘पोक्सो’सह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.