Maharashtra • Politics • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हा बँक निवडणूक: ‘बापाच्या’ पाऊलखुणावर वाटचाल, उमरखेड गटातून ‘राम’ची जिल्हा बँकेत एन्ट्री!

२५ विरुद्ध २५ चा थरार, रिकाऊंटिंग मधूनही निकाल कायम ; ईश्वर चिठ्ठीतून ‘राम देवसरकरांचा’ विजय

 भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत, आज संपूर्ण जिल्ह्याचे श्वास रोखून धरणाऱ्या, उमरखेड तालुका गटाचा अंतिम निकाल, अखेर जाहीर झाला. यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये २५-२५ मतांचा अभूतपूर्व टाय झाला. मात्र माजी आमदार प्रकाश पाटलांनी हार न मानता, पुन्हा रिकाऊंटिंग मागितली. त्यातूनही निकाल कायम राहिल्याने अखेर, ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्यात आली. यात, आपले वडील काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार अनंतराव देवसरकरांच्या पाऊल खुणांवर चालत, हिमतीने व चिकाटीने लढा देत शेवटी, ‘राम देवसरकरांनी’ यवतमाळ जिल्हा बँकेत एन्ट्री  घेतलीच.  

 

उमरखेड गटात एकूण ५२ मते होती. मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राम देवसरकर यांना २५ मते, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश पाटील देवसरकर यांना २५ मते मिळाली. मात्र भाजपाचे उमेदवार माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी, रिकाउंटिंगची मागणी केली. त्यातही दोघांना सम समान मते मिळाल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीचा अवलंब केला. 

 

गंमत म्हणजे या लढतीत भाजपा गटातीलच अपक्ष उमेदवार डॉ अंकुश देवसरकर यांना १ मत मिळाले, तर १ मत बाद ठरले. अपक्षाने घेतलेले १ मत आणि बाद झालेले १ मत यामुळेच हा सामना २५-२५ अशा टायवर येऊन ठेपला होता.

 

 

 

उमरखेडच्या या अत्यंत चुरशीच्या विजयानंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी यवतमाळ आणि उमरखेडमध्ये एकच जल्लोष सुरू केला आहे. सहकार क्षेत्रातील हा निकाल मात्र, जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.

 

यावेळी माजी जि प बांधकाम सभापती तातु देशमुख, गोपाल अग्रवाल, दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, अनिल कदम, जुबेर कुरेशी, गणेश बेले, वासिफ पठाण, सिद्धू जगताप, सोनु खतीब, मधुकर फटींग, संजू गाडगे, मंचकराव चव्हाण, सचिन देवसरकर,अरविंद माने, बाबुभाई पठाण ब्राम्हणगवाले, सुभाष शिंदे, दर्शन भंडारी आदि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.