प्रकाश देवसरकर २५, राम देवसरकर २५, अंकुश देवसरकर १, तर १ मत बाद!
यवतमाळ: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज एक अत्यंत धक्कादायक आणि रोमांचक ट्विस्ट समोर आला आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उमरखेड तालुका गटात चक्क ‘टाय’ झाला असून, राजकीय समीकरणांची गणिते पूर्णपणे बिघडली आहेत. या गटात एकूण ५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, ज्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आली आहे.
अशी आहे उमरखेड गटातील धक्कादायक आकडेवारी:
• प्रकाश पाटील देवसरकर (महायुती उमेदवार): २५ मते
• राम देवसरकर (महाविकास आघाडी उमेदवार): २५ मते
• डॉ अंकुश देवसरकर (भाजपा गटातील अपक्ष उमेदवार): ०१ मत
• बाद मत: ०१ मत
• एकूण मतदान: ५२ मते
अपक्ष उमेदवाराने बिघडवले गणित, महाविकास आघाडीला धक्का!
उमरखेड तालुका गटात महाविकास आघाडीचे रामदेव सरकर आणि महायुतीचे प्रकाश पाटील देवसरकर यांच्यात काटाजोड लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी २५-२५ मते मिळाल्याने हा सामना बरोबरीत सुटला आहे. विशेष म्हणजे, भाजपा गटातीलच अपक्ष उमेदवार डॉ. अंकुश देवसरकर यांनी घेतलेले १ मत आणि १ मत बाद ठरल्यामुळे या २ मतांनी संपूर्ण निकालाचा नूर पालटला.
चिठ्ठीवर ठरणार उमरखेडचा ‘किंग’!
दोन्ही प्रमुख उमेदवारांना समान मते पडल्यामुळे आता उमरखेड तालुका गटाचा अंतिम विजेता ठरवण्यासाठी चिठ्ठी काढली जाणार आहे. नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि उमरखेडची जागा कोणाच्या खिशात जाते, याकडे आता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.











Add Comment