Front • Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

नियमांची ‘ओव्हरलोड’ पायमल्ली; आरटीओ विभागाच्या मूकसंमतीने अपघातांना आमंत्रण, जबाबदार विभाग कुठे?

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ (उमरखेड) : तालुक्यात सध्या ऊस आणि इतर मालाची क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे विदारक चित्र, पाहायला मिळत आहे. उमरखेड शहरात, आरटीओ कॅम्प सुरू असलेल्या, शासकीय विश्रामगृहा समोरील, महागाव रस्त्यावर असलेल्या महात्मा फुले चौकात, एका ओव्हरलोड डबल ट्रॉली ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने, तब्बल चार तासांपासून ट्रॅक्टर जागेवर उभे असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. एकंदरीत रस्त्यांवरून धावणाऱ्या या ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला असून, या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. तर स्थानिक पोलिसांची वाहतूक व्यवस्था कुठे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

 

  गंमत अशी की, उमरखेड शहरातील महागाव रस्त्यावरील, शासकीय विश्रामगृहावर गुरवारी आरटीओचा कॅम्प सुरू होता. दरम्यान विश्रामगृहाच्या समोरील, महात्मा फुले चौकात असलेल्या

डीवाययसपी कार्यालया मागे, पुसदरोडकडून जुन्या तहसील रस्त्यामार्गे येत असलेला उसाने भरलेला एक ओव्हरलोड डबल ट्रॉली ट्रॅक्टरचा टायर, मुख्य रस्त्यावर धडामपणे फुटला. यामुळे मात्र महात्मा फुले चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान त्या ठिकाणी आणखी डबल ट्रॉली वाले, दोन ट्रॅक्टर पोहोचले. त्यामुळे तर ये जा करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. नवीन आलेल्या दोन ट्रॅक्टर पुढे नेण्यासाठी, एक ट्रॅक्टर हेड आणून, बाहेर काढण्यासाठी मोठी रस्सीखेच करावी लागली. मग अश्यावेळी जबाबदार असलेले विभाग झोपेत आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

 

बर हा एका दिवसाचा विषय आहे असेही नाही, दररोज अनेक अवजड वाहने, ट्रॅक्टर आणि ट्रक कोणत्याही नियमांचे पालन न करता, सर्रास ओव्हरलोड माल भरून प्रवास करत आहेत. 

 

गंमत म्हणजे, सध्या जोरात सुरू असलेल्या ऊस वाहतुकीच्या, ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त ऊस भरला जात आहे. हा ऊस केवळ वरच नाही, तर ट्रॉलीच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बाहेर आला आहे. अशा वाहनांमुळे मागून येणाऱ्या दुचाकी आणि इतर वाहनधारकांना समोरचा रस्ता दिसत नाही, तसेच वळणावर ही वाहने उलटण्याची दाट शक्यता असते. असे असतांना, आरटीओ विभागाचे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

आरटीओच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह!

अशा उघडउघड होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ‘आरटीओ’ विभागाची याला मूकसंमती आहे का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी असताना, आरटीओचे अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ कागदोपत्री कारवाईचा फार्स न करता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अशा धोकादायक वाहतुकीला आळा घालण्याची गरज नाही का, असा खमका सवाल निर्माण होत आहे.

 

 

नागरिकांमधून व्यक्त होणारा संताप!

 अशा ओव्हरलोड वाहनांमुळे तालुक्यात अनेक लहान-मोठे अपघात झाले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. बर दुसरीकडे, क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहने धावल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले रस्ते, वेळेआधीच उखडले जात असल्याचेही चित्र आहे. आरटीओ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे, नागरिकांच्या जीवावर भेतण्याचा प्रकार झाला, तर त्याला जबाबदार कोणाला धरावे, असे प्रश्न आहेत.

 

 

आरटीओ यवतमाळ कॅम्प अधिकाऱ्यांना माहिती मात्र, अधिकारी फिरकलेच नाही?

याबाबत यवतमाळ कॅम्पचे आरटीओ अधिकारी प्रशांत देशमुख यांना तत्काळ, या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. त्यांनीही ताबडतोब, कॅम्प सूरु असलेल्या ठिकाणावरील अधिकाऱ्यांना पाठविण्याची ग्वाही दिली जरूर, मात्र एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकलाच नसल्याची, परिस्थिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावरून या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता, निर्माण करणाऱ्या, बाबींवर लक्ष देण्यात वेळ नाही का, असा मोठा प्रश्न, नागरिकांनी निर्माण झाला आहे.

 

 

 स्थानिक वाहतूक व्यवस्थापन कुठे? 

जिल्ह्याचे एसपी कुमार चिंता यांनी, उमरखेड उपवाहतूक शाखा बंद केली. तेव्हापासून शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचे प्रकार रोजचे झाले आहेत. यावर नागरिकांकडे, संतपाशिवाय काहीच मार्ग उरला नाही. स्थानिक पोलीससांकडून चालविल्या जाणाऱ्या, वाहतूक व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी कुठे असतात, हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या या बाबींकडे लक्ष देण्यात, आता काय कोणती नवी शाखा उभी करावी लागणार, अशीही टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

 

एकंदरीत, आता तरी आरटीओ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन उमरखेड तालुक्यातील या जीवघेण्या ‘ओव्हरलोड’ वाहतुकीवर तातडीने दणकेबाज कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा एखाद्या मोठ्या अपघाताची वाट प्रशासन पाहत आहे का, असा टोला नागरिक लावताना दिसत आहे. याशिवाय तोकड्या कर्मचाऱ्याच्या भारोश्यावर, सुरू असलेली उमरखेडचे स्थानिक वाहतूक व्यवस्थापन, सुधारण्यासाठी पोलिसांकडून काही पाऊले उचलले जातात का, हे पाहावे लागणार आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.