Maharashtra उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

श्री क्षेत्र बालकास संस्थान येथे आज भव्य ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव’, ह.भ.प. पांडुरंग महाराज आळंदीकरांचे रंगणार मुख्य कीर्तन!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

उमरखेड : शहर लगत तिवडी रस्त्यावरील, श्री क्षेत्र बालकास संस्थान येथील श्रीकृष्ण मंदिरात आज, शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे, दरवर्षी प्रमाणे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिर व्यवस्थापन समिती कडून, पूर्ण मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 

 

या मंदिराला अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच दगडात आकर्षक नक्षीकाम करून कोरलेली श्रीकृष्णाची प्राचीन व मनमोहक मूर्ती विराजमान आहे. परम कृष्णभक्त श्री संत बालकदास महाराज यांचे जागृत समाधीस्थान याच ठिकाणी असून, मंदिराच्या सभागृहातील दगडी खांबांवर प्राचीन नक्षीदार कोरीव काम, आजही भाविकांचे लक्ष वेधून घेते. आजच्या या मंगलमय प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे

 

भजन संध्या :

 सोहळ्याची सुरुवात रात्री ठीक ८:३० वाजता होईल. यामध्ये उमरखेड येथील प्रसिद्ध ‘जय संतोषी माता भजनी मंडळ’ आपल्या सुमधुर भजनांनी भक्तीचा रंग भरेल.

 

श्रीकृष्ण जन्म कीर्तन :

 रात्री १० वाजता मुख्य कीर्तन सोहळ्याला प्रारंभ होईल. ह.भ.प. श्री पांडुरंग महाराज आळंदीकर यांच्या रसाळ वाणीतून आणि टाकळी येथील ‘माउली वारकरी भजनी मंडळ’ यांच्या साथीने श्रीकृष्ण जन्माचे मुख्य कीर्तन रंगणार आहे.

 

जन्मोत्सव व महाप्रसाद :

 

 रात्री ठीक १२:०० वाजता पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा केला जाईल. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या सोहळ्याचे निमंत्रक श्री गुरु दत्तात्रय पुरी महाराज व समस्त विश्वस्त मंडळ असून, त्यांनी परिसरातील सर्व कृष्णभक्तांना आणि भाविकांना या श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.