भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : येथील नगरपंचायतच्या कथित असुविधेवरून ढाणकीकरांचा पारा चांगलाच वाढला आहे. घरकुलचे थकीत हप्ते, वाढीव मालमत्ता कर, मोकाट जनावरे व पाणीपुरवठा संदर्भात, या मागण्यांसंदर्भात स्वातंत्र्यदिनिच बोंबाबोंब आंदोलन केल्याचे समोर आले. नागरिकांच्या प्रश्नावरून झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी, करण्यात आलेल्या आंदोलनाची सांगता, खासदार आष्टीकर यांच्या तोंडी विनंती व प्रशासनाच्या लेखी आश्वासनावरून, करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात, ढाणकिकरांनी मोठा सहभाग नोंदविला होता. नगरपंचायत प्रशासनाच्या एकंदरीत कारभाराबद्दल, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व चिड असल्याची या आंदोलनातून दिसून आले.
नगरपंचायत मधील विविध समस्या संदर्भात ७ ऑगस्टला निवेदन देऊन, त्वरित कारवाई करण्याची मागणी ढाणकीकरांची होती. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी इशारा देऊनही, कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनीच, आक्रमकपणे बोंबाबोंब आंदोलन करण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे, १५ ऑगस्टचा सकाळचा स्वातंत्र्य महोत्सव आटोपल्यावर, सकाळी ११ वाजता सोसायटीच्या कार्यालया जवळ सर्वपक्षीय आंदोलक जमा झाले. या कार्यालयापासून डफडे वाजवत, हातात तिरंगा झेंडे घेऊन रॅली नगर पंचायत कार्यालयाकडे निघाली. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौंक, जुने बस स्टॅण्ड वरून नगरपंचायत कार्यालयावर धडकली. यावेळी संतप्त झालेल्या सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व नागरिकांनी, नगरपंचायत कार्यालयात जाऊन घोषणा दिल्या. तसेच प्रांगणामध्ये ठिय्या देत, आक्रमकपणे बोंबांबोब आंदोलन करण्यात आले.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी खमकी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना, मध्यस्ती करण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यावरून भ्रमणध्वनीवरुन आंदोलकांशी संवाद साधून, ढाणकीकरांच्या सर्व समस्या एका महिन्यात सोडविण्याचे आश्वासन, खा अष्टीकरांनी दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, आंदोलन अंगलट येत असल्याचे पाहून, ढाणकी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनीही, मागण्याची एका महिन्यात पूर्तता केल्या जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर, आंदोलन कर्त्यांनी सदर आंदोलन स्थगित केले.
काय आहेत ढाणकीकरांच्या प्रमुख मागण्या!
पाणीपुरवठा सुरळीत करा, नादुरुस्त वाल तात्काळ दुरुस्त करावा.
घरकुल योजनेचे थकीत हस्ते त्वरित खात्यात जमा करावे.
वाढीव मालमत्ता कर रद्द करा.
गावठाण भूखंडांच्या नोंदीवरील दंडात्मक स्क्कम रद्द करावी.
मोकाट जनावरे, कुत्रे व गाढवांचा त्वरित बंदोबस्त करावा.
विकास होत नसल्याने नगरपंचायत रद्द करून परत ग्रामपंचायतचा दर्जा द्या.
आंदोलनात कोण कोण होते सामिल !
कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चंद्रे पाटील, मनसे तालुकाप्रमुख सादिक शेख, आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष जॉन्टी विनकरे, कॉग्रेस शहराध्यक्ष गजानन मिटकरे, शेख जहीर भाई, किशोर ठाकूर, वंचितचे तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड, युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल नरवाडे, माजी कॉग्रेस शहराध्यक्ष अमोल तुपेकर, संतोष मंतेवाड, वि का स सोसायटी अध्यक्ष बंटी वाळके, विश्वास धुळे, शे. अम्मुभाई, शे. अनिस, शिवाजी वैद्य, शे. खालिद भाई, माजी ग्रा प सदस्य बशीर भाई, शे सरवर भाई, बाबुराव नरवाडे, छबुराव धोपटे, शेख जुवेर, आनंद पोपुलवाड, शेख गुड्डु भाई, राजु पाटील, राहुल चंद्रे, शाहरुख पठाण, पप्पू गायकवाड, शेख अफरोज यांच्यासह ढाणकीतील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Add Comment