Maharashtra उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

उमरखेडच्या डीजेमुक्त ईद-ए-मिलादने दिला सामाजिक सलोख्याचा संदेश!

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त, साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव उमरखेड शहरात धार्मिक उत्साह, शिस्त आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा झाला. ईद-ए-मिलाद उत्सव समितीच्या वतीने, बुधवारी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत, हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले. विशेष म्हणजे डीजेचा दणदणाट टाळत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने, धार्मिक उत्साहासोबत शांतता, संयम आणि बंधुभावाचा प्रभावी संदेश दिला होता.

 

 शहरातील हजरत तातार शाह बाबा दर्गा येथून, बुधवारी सकाळी ९ दरम्यान मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध मशिदींचे पदाधिकारी, मौलवी, ईद-ए-मिलाद उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले. आठवडी बाजार, शिवाजी वॉर्ड, नाग चौक, संजय गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक आणि सुवर्णपथक मार्ग या प्रमुख मार्गांवरून, मिरवणूक शिस्तबद्ध वातावरणात मार्गक्रमण करत पुन्हा दर्गा परिसरात पोहोचली. मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मुस्लिम बांधवांसाठी, पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था केली होती.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांकडून, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याचे बघायला मिळाले. विविध मशिदींचे मौलवी, मागील वर्षीच्या सिरत कमिटीचे पदाधिकारी आणि यंदाच्या उत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली.

 

डीजेमुक्त मिरवणुकीची परंपरा कायम!

   शहरातील नागरिकांनी उमरखेड डिजेमुक्त होण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या होहिमेला सर्वांचीच साथ मिळत गेली. ठाणेदार पांचाळ यांनीही, शहरवासीयांच्या भावना विचारात घेत, कडक अंमलबजावणी केली. अनेक मिरवणुका डिजे मुक्त करून इतिहास रचला गेला. यंदाच्याही मिरवणुकीचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे डीजेचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला. ध्वनिप्रदूषण टाळत धार्मिक परंपरा, शिस्त आणि शांततेला प्राधान्य देण्यात आल्याने या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. धार्मिक उत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा असावा, हा आदर्श उमरखेडच्या डीजेमुक्त मिरवणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

 

सिरत कमिटीची विशेष भूमिका!

यावर्षीच्या सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद जावेद अब्दुल सुभान, उपाध्यक्ष हाफिज सय्यद शब्बीर, सचिव मौलाना रियाजुल हक, मौलाना अशरफ शरीफ चव्हाण, हाफिज शेख इरफान, मुफ्ती सोहेल रजा, हाफिज अहमद रजा, मौलाना बदरुल इस्लाम, हाफिज जाहेद शरीफ, मौलाना युसुफ रजा, मौलाना आयुब वास्ती, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना अब्दुल अलीम, मौलाना तजमुल अत्तारी, हाफिज जावेद अख्तर समितीचे प्रमुख होते. तर नियोजन व मार्गदर्शक समितीचे सैय्यद अफसर, मजहर टेलर, सैय्यद मुसा ट्रेलर, समद भाई, शाहादत खां,वजहात मुज़ावर, अमजद खान यासह आयोजन व मार्गदर्शन समितीचे सय्यद मूसा, सय्यद अफसर, साजिद उल्लाह जागीरदार, शहादत खान, सै इरफान, मुजाहिदुद्दीन खतीब, शेख तालिब, अमजद खान, सोनू खतीब, समद प्रिन्स, शाहरुख खान पठाण, कलिमुल्ला खान, रहमतुल्लाह जागीरदार, जाकीर राज, शहाबुद्दीन कुरेशी, सय्यद नईम रझा, शेख इम्रान, ताहिर मिर्झा,शेख नवाब, नजीब खान, सय्यद फराज, सय्यद तयजीर,जुबेर कुरेशी, सैय्यद सज्जाद, शेख असलम, वजाहत मुजावर, आसिफ काजी, अहेमद पटेल, इसा राज, अकील कुरेशी आदी उपस्थित होते. तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

ईदनिमित्त शहर काँग्रेसचे फळवाटप!

 शहर काँग्रेसच्या वतीने स्थानिक उत्तरवार रुग्णालयात, सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णांना फळ वाटप करून, ईद साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष जुबेर कुरेशी, सभापती रसूल पटेल, सभापती वीरेंद्र खंदारे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष वासीफ पठाण, अभय पवार, सय्यद काशीफ, ताहेर कादरी, नय्युम पायलट, माजीद भाई, आसिफ अहमद, जियाभाई टेलर यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थित होते.

 

उमरखेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

उमरखेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उमरखेड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. प्रमुख चौक, मिरवणुकीचा मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडली. यावेळी पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात, प्रभारी डीवायएसपी अमर मोहिते, ठाणेदार शंकर पांचाळ, सपोनी लक्ष्मी मलकुवार, व्यंकट गंगलवाड, विनायक रामोड व अमोल गुंडे, डीबी प्रमुख शरद लोहकर, फौजदार गणेश मुंडे, देविदास वाघमारे, सुदर्शन वानोळे, अमर खिल्लारे, सहायक फौजदार विजय पतंगे, ड्युटी मदतगार अतुल तागडे, गोपनीयचे संतोष राठोड, किरण राठोड, लता खंदारे यासह एलसीबी पथक, एसआरपीएफ कंपनी, एस एफ ग्रुप, होमगार्ड कर्मचारी व वर्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.