Maharashtra उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

एसआयआर मोहीम – उमरखेड (८२) विधानसभा मतदारसंघातून तब्बल २८ हजार ७८८ मतदारांची नावे वघळली!

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचे विशेष पुर्ननिरीक्षण आणि पडताळणी नंतरची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेतून मतदार यादीतील तब्बल २८ हजार ७८८ मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. यामध्ये दुबार, मृत, अनुपस्थित आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या नावांचा समावेश आहे.

 

निवडणूक विभागाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, पूर्वीची उमरखेड तालुक्यात एकूण मतदारांची संख्या ३,१९,२५५ इतकी होती. मात्र एसआयआर मोहिमेदरम्यान, त्यापैकी २,९०,४६७ मतदारांच्या फॉर्म्सचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांची कसून पडताळणी केली असता, एकूण २८,७८८ मतदार हे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी असणारे आढळून आले आहेत. प्रशासनाने नियमानुसार ही सर्व नावे चालू मतदार यादीतून वगळली आहेत. 

   दरम्यान, निवडणूक विभागाने राबविलेल्या एसआयआर प्रक्रियेमुळे मतदार वगळले गेल्याने, आता राजकीय पक्ष ही चांगलेच सतर्क झाले आहेत. वघळल्या गेलेल्या नावांपैकी, जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे, पुढे होणाऱ्या सुनावणी प्रक्रियेतून, परत कसे आणता येतील, या रणनीतीत व्यस्त झाली आहेत. निवडणूक विभागाकडून आता या संदर्भात लवकरच सुनावण्या सुरू होणार असून, पात्र मतदार संख्येत थोड्या प्रमाणात बदल होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदानाचा टक्का अचूक राखण्यासाठी हे शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अद्यावत मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, नागरिकांनीही आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्याकडून करण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्या मतदारांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे.

 

मृत मतदार

उमरखेड विधानसभेतील ९,१२२ मतदारांचा मृत्यू झाल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने, त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत.

 

कायमचे स्थलांतरित

  रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे विधानसभा क्षेत्र सोडून कायमचे इतरत्र गेलेले, असे ११,७१६ मतदार आढळले असून त्यांची नावे बाद झाली आहेत.

 

अनुपस्थित मतदार

मतदान केंद्राच्या परिसरात दीर्घकाळापासून अनुपस्थित असलेले ३,७५२ मतदार या प्रक्रियेत बाद करण्यात आली आहेत. 

 

 दुबार नोंदणी असलेले मतदार

 उमरखेडसह इतर ठिकाणीही आधीच मतदार म्हणून नोंदणी असलेले, जवळपास ४,१९८ मतदार दुबार आढळून आले, ज्यांची नावे उमरखेड विधानसभेच्या यादीतून कापण्यात आली आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.