india Maharashtra Uncategorized उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

काय झालं.. काय झालं, सरकारच डोक फिरल..! अश्या घोषणा देत, संतप्त डॉक्टरांचा एसडीओ कार्याल्यावर मोर्चा, उमरखेडमधील वैद्यकीय सेवाही बंद!

 

 

भारती महाराज, महासूत्र न्यूज

उमरखेड : राज्यातील सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यां बीएचएमएस डॉक्टरांना, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा, राज्य शासनाचा निर्णय धडकला. यावर आक्रमक होत, आधुनिक वैद्यकीय उपचार करण्यास परवानगी देण्याच्या, शासनाच्या निर्णयाविरोधात, इंडियन मेडिकल असोसिएशनने, चांगलेच दंड थोपटले आहे. रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड नको, असा स्पष्ट इशारा देत उमरखेड शाखेने, गुरुवारी शहरातून मोर्चा काढला. आज सकाळपासून वैद्यकीय सेवा बंद करीत, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविला.

 

मुळात एमबीबीएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्राचे सखोल शिक्षण, प्रत्यक्ष रुग्णसेवा, इंटर्नशिप आणि विविध विभागांतील दीर्घकालीन क्लिनिकल प्रशिक्षण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत अल्पकालीन सीसीएमपी अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक उपचारांना परवानगी देणे म्हणजे, वैद्यकीय शिक्षणाच्या मूलभूत निकषांनाच बगल देण्याचा प्रकार असल्याचा, गंभीर आरोप उमरखेड आयएमएने केला आहे. या निर्णयामुळे चुकीचे निदान, चुकीचे उपचार आणि त्यातून रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे, आयएमएने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वैद्यकीय पात्रतेच्या सीमारेषा धूसर झाल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य रुग्णांना बसू शकतो, अशी भीतीही संघटनेने निवेदनातून व्यक्त केली. यावेळी उमरखेड आयएमएच्या अध्यक्षा डॉ सारिका देशमुख, सचिव डॉ विवेक पत्रे, कोषाध्यक्ष डॉ मंगेश नरवाडे, डॉ या मा राऊत, डॉ प्रीती जयस्वाल, डॉ गजानन डोंगे, डॉ संदेश देशमुख, डॉ सोनाली बंग, डॉ श्रीकांत जयस्वाल, डॉ कुणाल काळे, डॉ किशोर राठोड, डॉ राम नाईक, डॉ प्रफुल भानेगावकर, डॉ अर्चना रावते, डॉ जयराम बसी, डॉ सारिका वानखेडे, डॉ नोहेद गौस, डॉ अरुण बंग, डॉ सुनील बंग, डॉ कृष्णा नाईक, डॉ नागेश माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य असणारे डॉक्टर मोठ्या संख्येने, या आंदोलनात सामील झाले होते.

वैद्यकीय सेवा बंद, रुग्णाचा जीव टांगणीला !

६ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजल्यापासून, ओपीडी, आयपीडी आणि इतर नियमित वैद्यकीय सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. यावर शासनाने तातडीने निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा, इशारा आयएमएने दिला आहे. यामुळे मात्र रुग्णांचा जीव टांगणीला लागणार असल्याचेही पुढे येत आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.