Agriculture News • crimes • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

पळशीत शेतकऱ्याच्या घामाच्या कमाईला आग, सोयाबीनचा ढिग पेटवून दिल्याने, ७० हजारांचे नुकसान!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

उमरखेड : दिवसरात्र शेतात राबायचे, उन्हातान्हात घाम गाळायचा, पिकाला लेकरासारखे जपायचे आणि हंगामाच्या अखेरीस हातातोंडाशी आलेल्या घासाची आशा बाळगायची. मात्र, याच कष्टाच्या कमाईला कोणी आग लाऊन पेटउन दिल्यास शेतकऱ्यावर किती मोठे संकट कोसळेल, तर मग अशा वेळी शेतकऱ्याने जगायचे तरी कसे, असाच एक गंभीर प्रकार पोफाळी परिसरातुन समोर आला. एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन पिकाची कापणी करून, ढिगारा मारून ठेवला होता. मात्र या ढिगाऱ्याला कोणी अज्ञाताने आग लावून पेटवून दिल्याची तक्रार, पोफाळी पोलिसात शेतकऱ्याने केली. यात तब्बल ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. आता यातील आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 

नंदकुमार रामचंद्र बेद्रे (५५) रा पळशी ता उमरखेड आहे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी शेतातील सोयाबीनची कापणी करून पीक ढिग करून ठेवले होते. १३ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान शेताकडे जाऊन पहिले असता, सोयाबीन पिकाचा ढिग सुरक्षित होता. मात्र, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर सोयाबीनचे ढिग जळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

शेतात कष्टाने पिकवलेले सोयाबीन आगीत जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारीत आठ ते दहा पोती सोयाबीन जळाल्याचे आणि अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीक विकून हाती पैसा येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. कुटुंबातही दुःखाची लाट कोसळली आहे.

 

सोयाबीनचे ढिग जळण्यामागे नेमके काय कारण आहे, आग अपघाताने लागली की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र शेतकऱ्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार निलेश शेंबडे यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार शिवाजी पवार करीत आहेत.

 

शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान 

शेतकऱ्याच्या घामातून उभे राहिलेले पीक जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यामागे कोणी खोडसाळपणा करून शेतकऱ्याचे दुष्काळाच्या तोंडावर मोठे नुकसान केले, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मात्र, पोफाळी पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.