भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : पैनगंगा अभयारण्य सकाळी सकाळी न्याहारीसाठी एक अस्वल बाहेर निघाला होता. दरम्यान नेहमी प्रमाणे शेताकडे जाणारा, एक ७० वर्षीय शेतकरी, अस्वलाच्या अचानक समोर आला. जंगलवाटेवर घडलेल्या या प्रकारामुळे, प्रारंभी अस्वल, अचंबित झाला. मात्र अस्वलाने न्याहारीच्या हव्यासापोटी, अचानक शेतकऱ्यावर झडप घातली. वृद्ध शेतकरी ही डगमगला नाही. या दोघांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल मध्ये, वृद्ध शेतकरी जखमी जरूर झाला. मात्र हिम्मत न हरता शेतकऱ्याने, अस्वलाचा सामना केल्याने, शेवटी अस्वलालाच माघार घेत, पळ काढावा लागल्याची चर्चा, बंदीभागात पसरली आहे. ही थरारक घटना, पैनगंगा अभयारण्यातील भवानी बिटमधून, शनिवारी ८ ऑगस्टला समोर आली.
देवराव भिकु मुडे (७०) रा चिखली, ता.उमरखेड असे अस्वलासोबत दोन हात करणाऱ्या जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. मुळात अभयारण्यात अनेक प्रकारच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. वाघ बिबट अस्वल अशी अनेक हिंस्र प्राणी असल्याचे, काही लपून राहिल नाही. या अभयारण्यात निव्वळ अस्वलांची संख्या जवळपास 19 वर असल्याची माहिती आहे.
अशातच, एक अस्वल सकाळी सकाळी न्याहारीसाठी बाहेर निघाला होता. त्याचवेळी एक वृद्ध शेतकरी ही, आपल्या शेताकडे निघाला होता. दरम्यान भर जंगलवाटेतच, अस्वल व शेतकरी आमने सामने आले. अस्वलानेही न्याहारी समजून शेतकऱ्यावर धावा बोलला. मात्र शेतकऱ्यांनीही नेटाने विरोध केल्याने, या दोघांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल मधून, वृद्ध शेतकरी जखमी झाला. मात्र शेतकऱ्याचे धाडस पाहून, ना विलाजाने शेवटी अस्वलाला न्याहरीची अशा सोडून पळ काढावा लागल्याची चर्चा, जंगलात पसरली आहे.
यात शेतकरी देवराव मुडे यांच्या पायावर, हातावर तसेच चेहऱ्यावर अस्वलाच्या माऱ्यातून, गंभीर जखमा झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आरडाओरड्याने, घटनेची माहिती भवानी परिसरातील नागरिकांना मिळाली. जखमी शेतकऱ्यास स्थानिकांनी, तातडीने कोरटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी, किनवट उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
वनविभागाच्या सत्रकतेच्या सूचना!
सदर अस्वल व शेतकरी यांच्या फ्रीस्टाइल घटनेची माहिती मिळताच, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कोरटा वनपरिक्षेत्र अधिकारी व्हीएन झांबरे तसेच बिटरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एसएस पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांकडून, परिसरातील नागरिकांना सांगण्यात आले आहे की, अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, अशा सतर्कतेच्या सूचना, वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.
१५ वर्षांपूर्वीची भयावह घटना पुन्हा चर्चेत
याच भागातील भवानी जवळील बोरगाव परिसरात, सुमारे १५ वर्षांपूर्वी अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्याची आठवण या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली. पैनगंगा नदीपात्र ओलांडून मराठवाड्यातील एका गावाकडे जात असलेल्या, जयस्वाल पिता-पुत्रीवर अस्वलाने क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे आजच्या हल्ल्याने बंदीभागातील नागरिकांमध्ये पुन्हा वन्यप्राण्यांच्या धोक्याची भीती निर्माण केली आहे.












Add Comment