Maharashtra उमरखेड ताज्या घडामोडी महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हा

उमरखेड बसस्थानकात पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ, ७० हजारांच्या ऐवजावर डल्ला!

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : येथील बसस्थानकावर लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक महिला बस मध्ये चढत होती. गर्दीचा फायदा घेत नेम लावून बसलेल्या अज्ञात चोरट्याने, महिलेच्या पर्समधील सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना, सोमवारी दुपारी घडली. अशा घटना वाढत असल्याने, बसस्थानकाच्या सुरक्षेवरून गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

 

शकुंतला शाम पवार (५०) रा बारड ता मुदखेड जि नांदेड असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. सदर महिला ह्या आपल्या मामाच्या मुलीसमवेत, मुळावा येथून बारड येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास, ऑटोने उमरखेड येथे आल्यानंतर त्यांना देवसरकर पेट्रोलपंपाजवळ उतरविण्यात आले. तेथून दोघी उमरखेड बसस्थानकावर पायी गेल्या. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास लातूरकडे जाणारी बस आल्यानंतर बसमध्ये मोठी गर्दी झाली. या गर्दीतून बसमध्ये चढल्यानंतर पवार यांनी तिकीट काढण्यासाठी आपली पर्स पाहिली असता, पर्सची चैन उघडी असल्याचे आणि त्यातील गुलाबी रंगाचे पाकीट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरी झालेल्या पाकिटात सोन्याची चैन, गंठन, दोन अंगठ्या, कानातील दागिने, ओमच्या दोन प्रतिमा, सोन्याच्या रिंगच्या जोड्या तसेच चांदीचा सिक्का असा, ६८ हजार ५०० रुपये किमतीच्या दागिन्यांचा ऐवज होता. याशिवाय १५०० रुपये रोख, आधारकार्ड व पॅनकार्ड देखील पाकिटात होते. असा एकूण ७० हजार रुपये किमतीच्या नगदी व सोन्याच्या दागिन्यावर, चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार दाखल झाली आहे. प्रकरणी उमरखेड पोलिसांनी तक्रार नोंदवून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.