Agriculture News • Maharashtra • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • महागाव • यवतमाळ जिल्हा

कोरडा दुष्काळ: विहिरीत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह !

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगीच्या एका ४४ वर्षीय शेतकऱ्याचा, काळी टेंभी शेतशिवारातील विहिरी मध्ये मृतदेह आढळून आल्याची खळबळ जनक घटना, २७ ऑक्टोबरच्या दुपारी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे, उमरखेड विधानसभेसह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, न मिळालेला पिक विमा अन् कोरड्या दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्याचे जीवन उद्वस्त करीत असल्याचे गंभीर चित्र, यानिमित्ताने निर्माण झाल्याचे पुढे येत आहे.

 

 

जगजीवन भिकाजी डोंगरे (४४) राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ, असे विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार जगजीवन डोंगरे यांच्या कडे साडेतीन एकर जमीन आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास, त्यांचा मृतदेह काळी टेंभी परिसरातील, शेत शिवाराततील विहिरीत आढळून आल्याची माहिती समोर आली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. 

 

ही घटना कुटुंबाला कळताच एकच आक्रोश निर्माण झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेचा पोलीस व महसूल यंत्रणा, सविस्तर  तपास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

 

यवतमाळ जिल्ह्याला पिक  विम्यातून  वगळल्याने, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून पीक विमा अद्याप मिळालाच नाही. दरम्यान उरावर उभा राहिलेल्या कोरड्या दुष्काळाने, शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. अशातच शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या, मोठ्या चिंतेचे कारण बनत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ अशा घटना रोखण्यासाठी, सर्व आवश्यक उपाययोजना करणे, गरजेचे असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

 

कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिकसह इतर मदत देण्यात येईल ! – तहसीलदार अभय मस्के, महागाव

 

महागाव तालुक्यातील काळी टेंभी शिवारातील विहिरीमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख झाली आहे. सदर मृतदेह  फुलसावंगी येथील शेतकऱ्याचा असून, शेतकरी आत्महत्या असल्याचा, प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. याप्रकरणी नियमानुसार शक्य तेवढ्या लवकर, संबंधित कुटुंबाला आर्थिक व इतर मदत देण्यात येईल. अशी प्रतिक्रिया महागावचे तहसीलदार अभय मस्के त्यांनी महासूत्रशी बोलताना दिली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.