भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : ब्राह्मणगावच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाणीपुरवठा विहिरीला २४ तास वीजपुरवठा मिळावा आणि वाढीव रोहित्र बसवावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले, पंचायत समितीचे माजी सदस्य नयन पुदलवाड यांना, २० तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देण्यात आले. रोहित्रारांची व्यवस्था डी पी टी सी मधून करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. भाजप नेते नितीन भुतडा आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने, तोडगा निघाल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या ब्राह्मणगावला सोईट (म.) शिवारातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या विहिरीचा वीजपुरवठा, दिवसातून केवळ आठ तास वीज मिळत होती. हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी नयन पुदलवाड यांनी १५ ऑक्टोबरपासून उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रश्नाची दखल घेत भाजप नेते नितीन भुतडा आणि प्रशासनाने मध्यस्थी केली. चर्चेअंती पाणीपुरवठा विहिरीला २० तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पुदलवाड यांनी उपोषण मागे घेतले. या आश्वासनामुळे ब्राह्मणगावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी भाजप नेते नितीन भुतडा, माजी आमदार विजयराव खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, बळवंतराव नाईक, प्रज्ञानंद खडसे, दत्तराव काळे, निळकंठ धोबे, महावितरणचे सहाय्यक अभियंता गिरी, सहाय्यक अभियंता शेख यांच्यासह ब्राह्मणगावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आता दिलेल्या आश्वासना नुसार प्रत्यक्षात २० तास वीजपुरवठा सुरू होतो का, याकडे ब्राह्मणगाव वासीयांचे लक्ष लागले आहे.












Add Comment