Maharashtra • Uncategorized • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

पुसद-हरदडा रस्ता कामात मुरूमाचा ‘रात्रीस खेळ चाले’; हॅमच्या नावाखाली, जिएनआय कंपनीवर अवैध मुरुम उत्खननाचा आरोप, प्रशासन ढिम्म!

भारती महाराज महासूत्र न्यूज

यवतमाळ  : हा यब्रीड अ‍ॅन्यूइटी मॉडेल (HAM) अंतर्गत सध्या सुरू असलेल्या पुसद ते हरदडा रस्ता सुधारणा कामात, एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या रस्ता कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, कारवाईच्या भीतीने की काय, हे संपूर्ण ‘मुरूम नाट्य’ रात्रीच्या अंधारात पार पाडले जात असल्याने आता या रस्ता कामाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

रात्रीच्या अंधारात ‘मुरूम’ गायब!

दिवसा शांतता आणि रात्री मात्र पोकलेन आणि हायवा गाड्यांचा धडधडाट, असे चित्र सध्या या परिसरात पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुमाचे उत्खनन करण्यापासून ते रस्त्यावर त्याचे अच्छादीकरण करेपर्यंतची सर्व कामे रात्रीच्या अंधारात अतिशय गुप्तपणे उरकली जात आहेत. महसूल विभागाचा डोळा चुकवून कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

 अंधारात कंदोरी मग रस्त्याच्या दर्जाचे काय??

 जर रस्ता काम आणि मुरुमाचे उत्खनन कायदेशीर आहे, तर ते रात्रीच्या अंधारात चोरट्या पावलांनी का केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या मुरुमाची रीतसर रॉयल्टी भरली गेली आहे का, की रॉयल्टी बुडवण्यासाठीच हा रात्रीचा खेळ सुरू आहे. रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या कामात मुरुमाच्या दर्जाची तपासणी कोण करतंय? यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

एकीकडे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची ओरड होत असताना, दुसरीकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र गाढ झोपेत सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. हॅम (HAM) सारख्या मोठ्या प्रकल्पात जर एवढ्या उघडपणे अवैध उत्खनन होत असेल, तर यामागे कोणाचे वरदहस्त आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

 

 

हॅमचा रस्ता काम करणारी जिएनआय कंपनी, महागाव रोडवरील एका बंद खदानीतुन अवैध उत्खनन करीत असल्याचा, सबळ पुरावा, महासूत्रच्या हाती लागला आहे. 

 

 

 

  याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करून रात्रीच्या वेळी चालणाऱ्या या अवैध उत्खननाला चाप लावावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.