Forest crime • Maharashtra • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

१ हजारांची लाच घेताना वनरक्षकावर ऐसीबीचा ट्रॅप !

वन्यप्राण्यांनी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप ; यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 भारती महाराज महासूत्र न्यूज

यवतमाळ : वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्यानंतर शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी, वन विभागातील महिला वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना, मंगळवारी 28 आक्टोबरच्या दुपारी यवतमाळ जिल्ह्यातून पुढे आली.

 

 

 कल्पना रुपसिंग राठोड ( ३०) वनरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), वन विभाग, हिवरी, जि. यवतमाळ, असे संबंधित महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ४७ वर्षीय फिर्यादी शेतकऱ्याने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी हिवरी येथील वन विभागाच्या कार्यालयात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. या भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित वनरक्षकाने प्रत्येक शेताच्या अर्जासाठी ५०० रुपये, असे एकूण एक हजार रुपये मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने २८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

 

 

 

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यानंतर दुपारी १.४२ ते १.५४ वाजेदरम्यान सापळा रचण्यात आला. यावेळी संबंधित महिला वनरक्षकाने स्वतःच्या कार्यालयात तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेतले आणि लाचेची रक्कम जप्त केली.

 

 

 

या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अहवालात नमूद आहे. संबंधित महिला वनरक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे. तिच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पर्यवेक्षणाखाली तर यवतमाळचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके यांच्या नेतृत्वात, ही सापळा कार्यवाही करण्यात आली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.