Editor Choice • Education • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

कौशल्याधारित शिक्षणातून आत्मनिर्भर बना: डॉ. नासिर शेख यांचे आवाहन; मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे मतदार जनजागृती कार्यशाळा, विद्यार्थ्यांनी घेतली मतदाता शपथ!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

उमरखेड : आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्याधारित शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन प्रा. डॉ. नासिर शेख यांनी केले. मिलिंद महाविद्यालय, मुळावा येथे १४ ऑक्टोबर रोजी राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळाच्या वतीने आयोजित मतदार जनजागृती कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास दामोदर होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल काळबांडे, इतिहास विभागप्रमुख डॉ. दशरथ पवार, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयमाला लाडे आणि ग्रंथपाल डॉ. राहुल धुळधुळे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. ज्योती खंदारे यांनी प्रास्ताविकातून राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

 

प्रा. डॉ. नासिर शेख यांनी लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक सत्रातील विषयांचे स्वरूप, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाच्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले.

 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी या दिवसाचे महत्त्व विशद केले. गेल्या सात दशकांत समाजात झालेल्या बदलांवर प्रकाश टाकत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. डॉ. जयमाला लाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विश्वास दामोदर यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून देत नोंदणी करण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक गावंडे यांनी केले, तर अंजली उबाळे हिने आभार मानले. यावेळी उपस्थितांनी सामूहिकरीत्या मतदाता शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शितल बलखंडे, उपाध्यक्ष माणिक गावंडे, सचिव अंजली उबाळे, कोषाध्यक्ष प्रज्वल मनवर तसेच सदस्य पूनम भालेराव, दुर्गा हेगडे, नंदिनी चव्हाण आणि अनिकेत माटाळकर यांनी पुढाकार घेतला. कार्यशाळेला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.