Maharashtra crimes • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेड; समोर खून झालाय, अंगावरील सोने काढा…म्हणत तोतया पोलिसांनी वृद्धाचे ३५ ग्रॅम सोने लुटले!

(उमरखेडमध्ये तोतया पोलिसांचा ८४ वर्षीय वृद्धाला गंडा  ; ३५ ग्रॅम सोने लंपास ; पुसदरोड लगतच्या कवडाशाबाबा रस्त्यावरील घटनेने खळबळ ) 

भारती महाराज महासूत्र न्यूज 

उमरखेड : “समोर खून झालाय, अंगावरील सोने काढून ठेवा,” असे सांगत पोलिसांची बतावणी करणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी ८४ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून त्यांच्याकडील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. उमरखेड शहरातील नगरपरिषदेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली.

 

राम कोडया कांबळे (८४) रा सिद्धेश्वर वार्ड, बोरबन, उमरखेड असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लक्ष्मी भोजनालयाकडून कंडाश्या बाबा दर्ग्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने जात होते. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून समोर खून झाल्याचे सांगितले. अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगत, स्वतः पोलिस असल्याची बतावणी करीत, तोतयागिरी करून वृद्धाची तब्बल ३५ ग्रॅम सोन्याचे दागिणे घेवून फसवणूक केल्याची खळबळजनक घटना, उमरखेड मधुन समोर आली.

 

या प्रकारात कांबळे यांच्या जवळील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाची दुसरी अंगठी आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, असा एकूण ३५ ग्रॅम सोन्याचा ऐवज आरोपींनी लंपास केला. या दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

दोन्ही संशयितांचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, एकाने निळ्या-पांढऱ्या रंगाचा चौकडीचा शर्ट, काळसर जिन्स व टोपी, तर दुसऱ्याने फिकट रंगाचा चौकडीचा शर्ट, काळसर जिन्स व टोपी घातली होती, असे वर्णन फिर्यादीने पोलिसांना दिले आहे.

 

या प्रकरणी राम कांबळे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३१९(२) आणि ३(५) नुसार ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही अनोळखी इसमांचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने परत मिळविण्याचे आव्हान, उमरखेड पोलिसांसमोर आहे. पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.