Criem • Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेडला घरफोडी; घराचे कुलूप तोडले, पेटी फोडली अन् अडीच लाखांवर डल्ला!

महासूत्र न्यूज

यवतमाळ : व्यावसायिक कामासाठी घराबाहेर गेले अन् संधी साधत, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीचे कुलूप फोडून त्यातील तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, लंपास केल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी, उमरखेड शहरातील शाह कॉलनी परिसरात उघडकीस आली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली असून, या घटनेने काही दिवसांपूर्वीच्या नाथनगर चोरीच्या घटनेचीही आठवण करून दिली आहे.

 

समशेर उर्फ छोटू लियाकत अली (४२), रा. शाह कॉलनी, उमरखेड, असे फिर्यादी व्यावसायिकाचे नाव आहे. ते ताडपत्री व कपड्यांचा व्यवसाय करतात. मागील दीड महिन्यापासून व्यवसायातून मिळणारी रोकड ते घरातील लोखंडी पेटीत जमा करत होते.

 

५ ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी भावासोबत घरातील रोकड मोजली. त्यावेळी पेटीत अडीच लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रोकड लोखंडी पेटीत ठेवून पेटीला कुलूप लावण्यात आले. दोन्ही भाऊ घरात झोपी गेले.

 

दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता दोघे भाऊ व्यवसायासाठी गाजेगाव येथे गेले. घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते शाह कॉलनीतील घरी परतले असता, घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. समोरील कोंडा कापलेला असल्याने घरफोडी झाल्याचा संशय त्यांना आला.

 

घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी पेटीचेही कुलूप तोडल्याचे दिसले. पेटीचे झाकण उघडे होते, तर त्यातील कागदपत्रे व बिलबुक अस्ताव्यस्त फेकलेली होती. पेटीत ठेवलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड मात्र गायब होती.

 

या घटने प्रकरणी समशेर अली यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक ठाणेदार व्यंकट गंगलवाड करीत आहेत.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.