Criem • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा भररस्त्यात विनयभंग!

महासूत्र न्यूज 

 यवतमाळ : उमरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. एका गावातील अकरावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी, आपल्या मैत्रिणींसह महाविद्यालयात जात होती. दरम्यान अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात अडवून विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना, उमरखेड तालुक्यातीलच एका गावातून, २४ सप्टेंबरच्या सकाळी अकरा दरम्यान पुढे आली. यामुळे मात्र पुन्हा एकदा विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र उमरखेड पोलिसांनी आरोपीला  तत्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे मात्र शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

उमरखेड तालुक्यातील एका गावातील, स्थानिक महाविद्यालयात शिकणारी अकरावीतील अल्पवयीन विद्यार्थिनी, गुरुवारी सकाळी पावणे ११ दरम्यान घरून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. नेहमीप्रमाणे वाटेत तिच्या दोन मैत्रिणी भेटल्या, तिघीही महाविद्यालयाकडे जात होत्या. दरम्यान, त्याच रस्त्यातच घर असलेला एक ३० वर्षीय आरोपी, नेहमी सारखा मुलींना ताडत बसलेला होता. मात्र विद्यार्थिनींनी त्याच्या कडे लक्ष न देता, चालत राहिल्या.

 

दरम्यान, विद्यार्थिनींचे अंतर कमी होताच, यावेळी हातात गुलाबाचे फुल घेऊन बसलेला माथेफिरू आरोपी, अचानक समोर येऊन उभा राहिला. पिडीत विद्यार्थिनीजवळ येत तिचा रस्ता अडवला. आरोपीने अल्पवयीन मुलीची ओढणी ओढून व अश्लील अंगचाळे करून तिचा विनयभंग केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने, पीडितेचा हात धरून स्वतःच्या घराकडे ओढत होता. दरम्यान सोबतच्या विद्यार्थिनी मैत्रिणीं चांगल्याच घाबरल्या होत्या. मात्र प्रसंगावधान राखून दोघींनीही जोराची आरडा ओरड केली. आवाज कानावर पडताच, आजु बाजुच्या गावकऱ्यांनी लागलीच धाव घेतली. मध्यस्ती करीत आरोपीच्या तावडीतून विद्यार्थिनीला सुखरूप सोडविण्यात येऊन, आरोपीला पकडून ठेवण्यात आले.

 

या घटनेची माहिती तत्काळ उमरखेड पोलिसांना देण्यात आली. मात्र आरोपीने राळ उठवत, पोलिसांना सांगितल्यास पिडितेसह नातलगांना जिवे मारण्याची धमकी दिली. असे सर्व गंभीर आरोप फिर्यादी विद्यार्थिनीकडून पोलिसात दिलेल्या तक्रारीतून करण्यात आले आहेत. मात्र या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी पकडून ठेवलेल्या आरोपीला, पोलिसांकडून जागीच ताब्यात घेण्यात आले.

 

उमरखेड पोलिसांनी पिडितेच्या जबाबानुसार, आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध विनयभंग, जिवे मारण्याची धमकी, मारहाण केल्याच्या तक्रारीनुसार, पोस्कोसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे करित आहेत.

 

या घटनेमुळे मात्र तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न, पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, पालक वर्गात आपल्या पाल्यांप्रती भीतीचे वातावरण पसरले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.