Fashion Food & Drinks Health & Fitness Maharashtra उमरखेड यवतमाळ जिल्हा

उमरखेडमध्ये माहेश्वरी समाज महिलांकडून हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन!

उमरखेड : महिलांमधील उद्योजकता, हस्तकला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी, माहेश्वरी महिला संगठन यांच्या वतीने, मंगळवार २१ जुलै रोजी स्व .गो सो सारडा राजस्थानी भवन येथे, सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत महिला हस्तकला व उद्यमिता प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन, माहेश्वरी समाजाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय भूतडा तसेच राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष राजकुमारजी भंडारी यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला उद्योजिका व नागरिकांची उपस्थिती होती.

प्रदर्शनामध्ये महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, गृहउद्योगातून निर्मित उत्पादने, कलात्मक साहित्य तसेच स्वयंपूर्ण व्यवसायाशी संबंधित विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री झाली. या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची तसेच ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. 

     यावेळी माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा लता माहेश्वरी, सचिव कीर्ती भट्टड यांच्यासह मांगीलालजी जांगिड , विजयकुमार जैन, निधी भुतडा, पूजा भुतडा , साधना बाहेती, स्मिता सारडा उपस्थित होते. सदर उपक्रम राबविण्यात सरला बंग, ललिता बंग, पूजा तेला, मंगल भंडारी, सपना बाहेती व सर्व माहेश्वरी महिला मंडळाच्या महिलांनी परिश्रम घेतले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.