Agriculture News • Front • Maharashtra • political party • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

आमदार रोहित पवार शेतकऱ्यांसह काळया दिवाळीसाठी, ६ नोव्हेंबरला उमरखेडमध्ये; अतिवृष्टी, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारणार!

भारती महाराज महासूत्र न्यूज 

यवतमाळ (उमरखेड) : शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे, ६ नोव्हेंबर रोजी उमरखेडमध्ये येणार आहेत. अतिवृष्टीमुळे झालेली शेतीची नासधूस, पीकविमा, नुकसानभरपाई आणि शासकीय मदतीतील दिरंगाई अशा प्रश्नांवर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी, स्थानिक शिवाजी महाराज चौकात ‘काळी दिवाळी’ प्रतीकात्मक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात हजेरी लाऊन, प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे गंभीर संकट कायम असताना नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि शासकीय मदतीतील अडचणींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई आणि पीकविम्याची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमरखेडमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

या आंदोलनाला आमदार रोहितदादा पवार उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ निवेदन स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेण्यासाठी विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरखेड येथे हा मेळावा होणार आहे. यामध्ये पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई, कर्ज, शासकीय मदत, शेतीमालाचे भाव, सिंचन आणि इतर शेतीविषयक प्रश्नांवर शेतकऱ्यांना थेट आपली भूमिका मांडता येणार आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासन व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि अन्यायाविरोधात एकजूट दाखविण्यासाठी उमरखेड तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व मागण्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, विधानसभा अध्यक्ष राजुभैया जयस्वाल यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून  करण्यात आले आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.