भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : पत्नीच्या तब्यतीच्या कारणावरून मिळालेल्या वैदकिय सल्ल्यानुसार, सकाळी हुलकाने दांपत्य मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान ब्राम्हणगावकडून हरदडा मार्गे ढाणकीकडे जाणाऱ्या भरधाव कारची, पत्नी अंजलीसोबत गप्पा करीत चालत असलेले गायत्री इलेक्ट्रॉनिकचे संचालक कुंदिप हुलकाने यांना जोरदार धडक बसली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही खळबळजनक घटना २४ ऑक्टोबरच्या सकाळी 6 दरम्यान घडली. घटना बाहेर येताच ब्राह्मणगावसह विडूळ परिसरात शोककळा पसरली आहे.
कुंदिप गंगाधर हुलकाने ( ४० ) रा ब्राम्हणगाव ता उमरखेड असे मृत्तकाचे नाव आहे. मृत्तक कुंदिप यांच्या पत्नी अंजली हुलकानेंच्या तब्यतीच्या कारणावरून, डॉक्टरांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार पत्नीसह मॉर्निंग वॉक करीत होते. पत्नीसह चालत असतानाच्या दरम्यान, छत्रपती संभाजीनगर – माहुर या राष्ट्रीय महामार्गावरील, ब्राम्हणगांव हरदडा रस्त्यावर असलेल्या कॅनवल जवळ, ब्राम्हणगाव कडून ढाणकीकडे जाणाऱ्या भरधाव कार क्र, एम एच २६ सीवाय ६२७२ या कारने जोरदार धडक दिली. यावेळी डोक्याला व शरीराला जोरदार मार लागल्याने यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान काहींनी मृतक कुंदीप यांना सुरुवातीला ढाणकी व नंतर उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सपोनि अमोल गुंडे व बीट जमादार दिलीप चव्हाण यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तात्काळ फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावर धडक देत पाहणी केली. दरम्यान नातलगांनी उमरखेड पोलीस स्टेशन वर धडक देत मोठी गर्दी केली होती. प्रकरणाचा पुढील तपास, उमरखेड पोलीस करीत आहेत.
चौकट
पोलीस अधिकाऱ्याची कार असल्याची चर्चा !
ब्राह्मणगाव रस्त्यावर जोरदार धडकेत युवा व होतकरू उद्योजक कुंदीप हुलकाने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र धडक मारणारी कार, बिटरगाव पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याची असल्याची चर्चा पुढे आली. अपघाता वेळी एक महिला कार चालवीत असल्याचा आरोप ही नातलगांकडून करण्यात आला होता. सदर महिलेच्या अटकेची ही मागणी संतप्त नातलगांनी यावेळी केली होती. त्यामुळे या अपघातातील, नेमका कार मालक पोलीस अधिकारी कोण, प्रत्यक्ष अपघाता वेळी त्या कारचा चालक कोण, यावरून नातलगांकडून शंका कुशंका, उमरखेड पोलिसांच्या आवारात निर्माण करण्यात आल्या होत्या. मात्र वरील प्रश्नाचे उत्तरे अद्यापही पुढे आली नाहीत.












Add Comment