महासूत्र न्यूज
उमरखेड : शहरातील पुसद रोड ते तहसील कार्यालय, या डांबरी रस्त्याच्या कामासाठी, लाखोंचा निधी खर्ची लागला आहे. मात्र खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. दरम्यान ठेकेदाराने, खोदलेल्या मोठ्या गड्ड्यातील पाणी डिझेल पंपाच्या साह्याने, रस्त्यावर उपसा करून सोडल्याने, रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आता नगरपरिषद काय कार्यवाही करते याकडे नजर लागल्या आहेत.
पुसद रोड ते तहसील कार्यालयावर असलेल्या खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. या बांधकामाच्या पिटीशन साठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. त्यातील साचलेले पावसाचे पाणी, ठेकेदारांनी चक्क नगर परिषदेच्या डांबरी रस्त्यावर, डिझेल पंपाद्वारे अनेक दिवसापासून, सोडणे सुरू आहे. यामुळे मात्र डांबरी रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून, रस्ता नामशेष झाला आहे. यातून झालेल्या नुकसानाची भरपाई करणार कोण, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक निधीतून तयार झालेल्या रस्त्याची, अशाप्रकारे ठेकेदार वाट लावत असेल तर, यावर नगरपरिषदेने कार्यवाही करणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून, नुकसान भरपाई वसूल केली जाईल का, असा ही प्रश्न आहे. यावर नगरपरिषद काय कार्यवाही करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
नगर परिषदेने रस्ता भाड्याने दिला काय?
सार्वजनिक वापरासाठी असलेला नगरपरिषदेचा डांबरी रस्ता, एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या पाणी निचऱ्यासाठी वापरला जात असेल, तर नगरपरिषद प्रशासनाने याची परवानगी नेमकी कोणत्या आधारे दिली. परवानगी दिली नसेल तर मग, संबंधितांवर कारवाई का नाही. त्यामुळे नगरपरिषदेने रस्ता भाड्याने दिला की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चौकट
रस्त्याची भरपाई कोण करणार?
मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या, गड्ड्यातील पाण्याच्या सततच्या विसर्गामुळे डांबरी रस्ता नामशेष झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च, पुन्हा नागरिकांच्या करातूनच होणार, की नुकसान करणाऱ्या संबंधितांकडून, वसूल केला जाणार, असा प्रश्न आहे. नगरपरिषदेच्या मालमत्तेचे झालेले नुकसान म्हणजे थेट नागरिकांच्या पैशांचे नुकसान असल्याने, नुकसानभरपाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी, आता नागरिकांकडून होत आहे.












Add Comment