उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

स्वातंत्र्य मिळाले हो, मात्र उपोषण कर्त्यांना न्याय कोण देणार? उमरखेडमध्ये स्वातंत्र्यदिनीही दोन उपोषण सुरूच!

महासूत्र न्यूज

उमरखेड (प्रतिनिधी) : एकीकडे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे उमरखेड शहरात न्याय व हक्काच्या मागणीसाठी दोन उपोषण मंडप सुरूच आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही प्रशासनाकडून या आंदोलकांशी संवाद साधून उपोषण सोडविण्याचा ठोस प्रयत्न झाला नसल्याने, राजकीय व प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक शिवाजी महाराज चौकात, श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचे उपोषण, १२ ऑगस्टपासून सुरू आहे. भारत पेट्रोलियम पंपाच्या कथित अनधिकृत बांधकामाची चौकशी, परवानगी प्रक्रियेची तपासणी, कथित नियमबाह्य परवानगी रद्द करणे, बांधकामाबाबत योग्य ती कारवाई करणे आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत पेट्रोल-डिझेल पुरवठा बंद करण्यासह विविध मागण्या, समितीने केल्या आहेत. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंतही या आंदोलनावर तोडगा निघाला नाही.

दुसरीकडे उपविभागीय कार्यालयासमोर, १३ ऑगस्टपासून, खरबी येथील आदिवासी शेतकरी बांधव शेतीच्या हिस्सेवाटप व स्वतंत्र सातबारा उताऱ्यांच्या मागणीसाठी, उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांसोबत प्रशासनाने शुक्रवारी एका प्रशासकीय प्रतिनिधीमार्फत चर्चा करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो ही निष्फळ ठरल्याचे पुढे आले. त्यामुळे या प्रश्नावरही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.

एकाच शहरात दोन ठिकाणी नागरिक आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले असताना, स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही प्रकरणांकडे अधिक गांभीर्याने पाहून आंदोलकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकंदरीत, दोन्ही उपोषणे अद्याप सुरू असून, आता तरी प्रशासन आंदोलकांशी संवाद साधून तोडगा काढणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

दोन्ही उपोषणकर्त्यांशी चर्चा झाल्या  – एसडीएम सखाराम मुळे

 उमरखेड शहरात स्वातंत्र्यदिनी ही सुरू असलेल्या, दोन ही उपोषणकर्त्यांशी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा झाली आहे. वरिष्ठानसह उपोषणकर्त्यांना, पत्रव्यवहारही करण्यात आले. मात्र दोन्ही उपोषणकर्त्यांच्या मागण्या, आमच्या कार्यालयाच्या अखत्यारीत  येत नसल्याने, मार्ग काढण्यात सफलता मिळाली नाही. अशी प्रतिक्रिया उमरखेडचे उपविभागीय अधिकारी, सखाराम मुळे यांनी दिली.

 

आता समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार – भैय्या पवार!

श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती  समितीचा अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. अनेक वेळा आंदोलन, रस्ता रोको, निवेदन, न्यायालयीन लढाई, अक्षरशा जेलवारी ही झाली आहे. त्याचे फलित आज महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात थाटात उभा झाला आहे. मात्र आमच्या वरील मागण्यांसाठी, समितीचे पुन्हा उपोषण सुरू झाले आहे. 12 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन महोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे समितीच्या मागण्यांवर राजकीय व प्रशासकीय गंभीरता दिसून येत नाही. आता मात्र, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्या जाईल. अशी प्रतिक्रिया, श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचे अध्यक्ष भैय्या पवार यांनी दिली आहे.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.