Health & Fitness • Maharashtra • उमरखेड • ताज्या घडामोडी • महत्वाची बातमी • यवतमाळ जिल्हा

उमरखेडमध्ये मोफत भव्य गुडघा व नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन, ११ ऑक्टोबर पर्यंत चालणार शिबिर!

भारती महाराज महासूत्र न्यूज

उमरखेड : येथील ‘ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई’, ‘संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ तसेच ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्थानिक राजस्थानी भवनात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजा श्री अग्रसेन जन्मोत्सव आणि माँ बनारसी देवी अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित, या ‘मोफत गुडघा तपासणी व भव्य गुडघा आणि नितंब (Knee & Hip) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे’ उद्घाटन, मान्यवरांच्या उपस्थितीत, ९ ऑक्टोबरला उत्साहात संपन्न झाले.

 

 

या शिबिराचे उद्घाटक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उमरखेड शहराच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन, अग्रवाल सेवा समिती अध्यक्ष भगवानदास अग्रवाल, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कोडगीरवार, तर शिबिरासाठी लाभलेले, डॉ शारीक अन्सारी, डॉ प्रिया, अग्रवाल महिला संघटनच्या अध्यक्षा सुषमा अग्रवाल, तसेच प्रभादेवी अग्रवाल यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

 

यापूर्वी अवघ्या २४ तासांत ५१२ रुग्णांची यशस्वी तपासणी करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करणाऱ्या, तज्ज्ञ वैद्यकीय चमूने पुन्हा एकदा अधिक मोठ्या प्रमाणात, गरजू रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प केला आहे. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत उपचार मिळणार आहेत.

 

हे शिबिर शुक्रवार, शनिवार आणि रविवार दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत, सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत, उमरखेड शहरातील, महागाव रोडवर असलेल्या राजस्थान भवन येथे सुरू राहणार आहे.

 

 उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ममता हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अग्रवाल सेवा समिती व ममता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले .

 

या निःशुल्क शिबिरामध्ये उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी, 300 च्या वर रुग्णांनी, तपासणी व एक्स-रे साठी सहभाग नोंदवला तर 52 रुग्ण आतापर्यंत प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले आहे. अग्रवाल सेवा समिती उमरखेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री नंदकिशोर अग्रवाल आणि श्री गोपाल भाऊ अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभल्याचे, समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी राबणारे, अग्रवाल सेवा समितीचे कपिल भारुका, भूषण अग्रवाल, सौरभ अग्रवाल, दिनेश अग्रवाल, अनुप भारुका, रवि अग्रवाल, अजय अग्रवाल, विनोद अग्रवाल, गोविंद अग्रवाल, दर्शन अग्रवाल, सविता अग्रवाल, सपना अग्रवाल, शारदा अग्रवाल, सरिता अग्रवाल, अनुपमा अग्रवाल, रंजना अग्रवाल, सविता अग्रवाल, मनिषा अग्रवाल, सुनीता अग्रवाल, ममता अग्रवाल, संध्या अग्रवाल, किरण अग्रवाल आदी सदस्य उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन सेवा समितीचे सचिव संदीप अग्रवाल यांनी केले.

ads

About the author

मुख्य संपादक: श्री. गजानन भारती महाराज

Add Comment

Click here to post a comment

Weather Information

YAVATMAL WEATHER

Cricket Score

Rashifal

Featured

Advertisement

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे.