भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : महागाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवर, १८ ऑगस्टच्या रात्री झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, उमरखेड डॉक्टर असोसिएशनने गुरुवारी एसडिओंना निवेदन दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी, निवेदनातून करण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महागाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त किंवा सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करून ती कार्यान्वित ठेवणे, तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना लागू करावी. हल्ल्यात जखमी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य वैद्यकीय उपचार तसेच आवश्यक प्रशासकीय मदत देण्यात यावी, महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी उमरखेड डॉक्टर असोसिएशनने अध्यक्ष डॉ गजानन कोडगीरवार , उपाध्यक्ष डॉ मंगेश नरवाडे , सचिव डॉ प्रफुल भानेगावकर ,कोषाध्यक्ष डॉ पांडुरंग मुलगीर, डॉ विवेक पत्रे , डॉ अरुण बंग, डॉ सुनील बंग, डॉ श्रीराम रावते, डॉ कुणाल काळे , डॉ आशिष साखळे ,डॉ धनंजय व्यवहारे ,डॉ गजानन येलुरे सह अनेक डॉक्टर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .












Add Comment