भारती महाराज महासूत्र न्यूज
उमरखेड : शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, कृतीआधारित व विद्यार्थीकेंद्री अध्यापन, शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रमांची, प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन, उमरखेडचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी, विजय बेतेवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत, पिंपळदरी येथे शनिवारी ८ ऑगस्टला, जि प उच्च प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडलेल्या, पहिल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेतेवाड बोलत होते.
या शिक्षण परिषदेत मासिक कामाचा आढावा, शिक्षकांच्या अनुभवांची देवाणघेवाण, वर्ग नियोजन, आधार संलग्निकरण व इतर प्रशासकीय बाबी, समाज सहभाग, UDISE+ प्रणाली तसेच खान अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाइन शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळाजी कवळे होते. मुख्याध्यापक पोफाळकर यांनी प्रास्ताविक केले. केंद्र समन्वयक स्वप्नील मार्कंड यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे नियोजन करण्यात आले.या परिषदेस केंद्रातील शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Add Comment